जातीय बिरुदं गळून पडतील, तेव्हा आरक्षणाची गरज उरणार नाही. तशी व्यवस्था निर्माण होत नाही, तोवर तरी आरक्षणाला पर्याय नाही!
समाजातील आर्थिक दरी विषमता, गरीब आणि श्रीमंत यांच्यातली वाढणारी दरी जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत जातीय सामाजिक तेढ किंवा आरक्षणवादी चळवळ ही अशीच सुरू राहणार. जोवर देशातली व्यवस्था आर्थिक निकषांवर दुरुस्त होत नाही, वंचित पीडित समाज जेव्हा सवर्णीयांच्या बरोबरीनं प्रगत होताना दोघांनाही सम प्रमाणात संधी उपलब्ध होतील, जातीय बिरूदं गळून पडतील; तेव्हा आरक्षणाची गरज उरणार नाही.......